अमरावती : चिखलदरामध्ये भाजप नगरसेवक अजय शर्माने चांगलाच गोंधळ घातला. पर्यटनासाठी आलेल्या अकोला महापालिकेतील नगरसेवक आणि त्याच्या मित्रांनी दारु पिऊन चिखलदराचे तहसील आर. यू.सूराडकर यांना मारहाण केली.
ऐनवेळी एमटीडीसीच्या रिसॉर्टचं आरक्षण मिऴालं नसल्याच्या कारणावरुन नगरसेवकाने हा धिंगाणा घातल्याच तक्रारदारांकडून सांगण्यात आलं.
या मारहाणीत सूराडकर यांच्या हाताला जखम झालीय. यासंदर्भात नऊ जणांवर चिखलदरा पोलीसांनी गुन्हे दाखल केलेत, तर अचलपूर इथल्या न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.