चाळीसगाव : एसटी आणि कंटेनर समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारेजवळ धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. बसला कंटेनरची धड़क इतकी जोरात होती की अर्धी बस कापली गेली. यात १५ जण जागीच ठार झाले. चाळीसगाव सूरत बस असल्याचे माहिती समोर आली आहे.
चाळीसगावहून धुळ्याला बस जात होती, तर कंटेनर धुळ्याहून- चाळीसगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, एका दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना कंटनरने जोरदार धडक दिली. यात एसटीमधील १९ प्रवासी ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, हा रस्ता धोकादायक असल्याने स्थानिक आमदार यांनी रस्ता रुंदीकरणाची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बालाजी कंपनीचा एक मोठा कंटेनर बसला धडकलाय. चाळीसगाव रुग्णालयात तसंच धुळे जिल्हा रुग्णालयात जखमींना हलवण्यात आलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.