पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यात.
आळंदीतून माऊलींची पालखी निघाली. तर आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणारी तुकोबारायांची पालखीही पुण्यात पोहोचली.
माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात आहे.तर तुकोबारायांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी आहे.
पहाटेपासूनच पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केलीये. वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना अन्नदानासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आलेत. पुणेकरांनी दोन्हीही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली.
या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे. दरम्यान पालखी सोहळ्यासोबतच्या दिंड्यांचाही पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम असणार आहे. या मुक्कामानंतर माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकोबांची पालखी मुंढवामार्गे पंढरपूरकडे रवाना होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.