शहीद सौरभ फराटेंना अखेरचा निरोप

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पुण्यातील हडपसर येथील भेकराई नगरचे सौरभ नंदकिशोर फराटे यांना अंत्यत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. 

Updated: Dec 19, 2016, 09:46 AM IST
शहीद सौरभ फराटेंना अखेरचा निरोप

फुरसुंगी, पुणे : जम्मू काश्मीरच्या पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सौरभ फराटें यांना फुरसुंगीमध्ये अखेरचा निरोप देण्यात आलाय.

हुतात्मा सौरभ यांच्यावर फुरसुंगीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद फराटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. 

अमर रहे, अमर रहेच्या घोषणा देत शहिद सौरभ फराटेंना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झालं होतं. 61-राष्ट्रीय रायफल्सचे तोफंजी असलेल्या सौरभ फराटे यांना शनिवारी पंपोरमध्ये शत्रूशी लढताना वीरमरण आलं होतं.सौरभ यांच्या पश्चात वडिल, आई पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.