मुंबई : कोकणातील आंगणेवाडीची जत्रा प्रसिद्ध मानली जाते. या जत्रेसाठी मुंबईहून अनेक भाविक कोकणात जातात. यादरम्यान कोकणात विशेष गाड्याही सोडल्या जातात. यंदाही कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी दादर सावंतवाडी दादर, मुंबई सीएसची झाराप मुंबई सीएसटी आणि एलटीटी झाराप एलटीटी या तीन नव्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
या आहेत नव्या गाड्या
1. गाडी क्रमांक 01095 / 01096 दादर - सावंतवाडी - दादर विशेष : -
गाडी क्रमांक 01095 दादर - सावंतवाडी विशेष गाडी - 23 आणि 25 फेब्रुवारी 2016 रोजी 07.50 वाजता दादरवरुव सुटेल आणि त्याच दिवशी दिवशी 19.20 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01096 सावंतवाडी - दादर विशेष गाडी - 24 आणि 26 फेब्रुवारी 2016 ला 06.15 वाजता सावंतवाडीवरुन सुटेल आणि 15.50 वाजता दादर पोहोचेल. त्याच दिवशी .
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली , सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल. ही 12 डब्यांची गाडी असेल.
2. गाडी क्रमांक 01091 / 01092 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस - झाराप - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष : -
गाडी क्रमांक 01091 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस - झाराप विशेष गाडी - सकाळी 11.30 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटेल . 24 फेब्रुवारी 2016 रोजी ही गाडी त्याच दिवशी 22.25 वाजता झारापला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01092 झाराप - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष गाडी - 25 फेब्रुवारी 2016 रोजी 01.55 वाजता ही गाडी झारापवरुन सुटेल. ही गाड त्याच दिवशी 12.30 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल.
गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीला 19 डबे असतील.
3. गाडी क्रमांक 01005 / 01006 लोकमान्य टिळक टर्मिनस - झाराप - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष : -
गाडी क्रमांक 01005 लोकमान्य टिळक टर्मिनस - झाराप विशेष गाडी - 23th फेब्रुवारी 2016 रोजी ही गाडी 00.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल त्यानंतर ही गाडी त्याच दिवशी 09.45 वाजता झारापला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01006 झाराप - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी - 23 फेब्रुवारी 2016 रोजी 14.55 वाजता झारापवरुन सुटेल. ही रेल्वे 23.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली , सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबतील.या गाडीला 23 डबे असतील.
4. गाडी क्रमांक 01033 / 01034 लोकमान्य टिळक टर्मिनस - झाराप - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष : -
गाडी क्रमांक 01033 लोकमान्य टिळक - झाराप विशेष गाडी - 24 फेब्रुवारी 2016 रोजी 01.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी 09.45 वाजता झारापला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01034 झाराप - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी - 24 फेब्रुवारी 2016 रोजी 14.55 वाजता झारापवरुन सुटेल. ही रेल्वे 23.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली , सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीला २3 डबे असतील.
5. गाडी क्रमांक 01089 / 01090 लोकमान्य टिळक टर्मिनस - झाराप - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष : -
गाडी क्रमांक 01089 लोकमान्य टिळक झाराप विशेष गाडी - 25 फेब्रुवारी 2016 रोजी 01.20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी 10.10 वाजता झारापला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01090 झाराप - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी - 25 फेब्रुवारी 2016 रोजी 12.35 वाजता झारापवरुन सुटेल. ही रेल्वे 23.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण , रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबतील. या गाडीला 23 डबे असतील.