पुणे : शहरातील कृषी महाविद्यालयातील विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचं आज सकाळी उघडकीस आले. प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने युगुलाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.
याबाबतीत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हिरामण शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी महाविद्यालयात असलेल्या विष्णुकृपा नगरमधील यशोदा लक्ष्मण म्हेत्रे, वय 24 आणि अभिजित तिमय्या माडे, वय 19 हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होते. तशी नोंद पोलिस ठाण्यात दाखल होती.
शुक्रवारी कृषी महाविद्यालयच्या क्षेत्रात येणाऱ्या विहिरीत सुरक्षारक्षकाला एकमेकांचे हात बांधलेले दोन मृतदेह तरंगताना आढळून आले. महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. प्रेमी युगुलाच्या नातेवाइकांनी कपड्यांवरून मृतदेह ओळखले.
प्रेमप्रकरण उघडकीस येईल या भीतीने सुमारे आठ दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.