ग्राहकांची फसवणूक केली नसल्याचा 'मॅपल ग्रूप'चा दावा

पुण्यातील मॅपल ग्रुपची पाच लाखात घर देण्याची योजना चांगलीच वादग्रस्त ठरतेय. जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे कुठलीही नोंदणी न करण्याचे आदेश या बिल्डरला दिले आहेत. 

Updated: Apr 20, 2016, 10:48 AM IST
ग्राहकांची फसवणूक केली नसल्याचा 'मॅपल ग्रूप'चा दावा title=

पुणे : पुण्यातील मॅपल ग्रुपची पाच लाखात घर देण्याची योजना चांगलीच वादग्रस्त ठरतेय. जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे कुठलीही नोंदणी न करण्याचे आदेश या बिल्डरला दिले आहेत. 

मात्र, काही गैरसमज आणि चुकीमुळे हा प्रकार झाल्याचं मॅपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांनी सांगितलंय. 

पोलिसांसमोरच पळाला सचिन अग्रवाल... 

दरम्यान आपलं घर योजनेत हजारो लोकांना फसवणाऱ्या सचिन अग्रवालवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन अग्रवाल पोलीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समोरुनच पळालाय.

'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात लाईव्ह देण्यासाठी सचिन अग्रवाल पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सचिन अग्रवालला पकडण्यासाठी पोलीस तातडीनं 'झी २४ तास'च्या कार्यालयाबाहेर दाखल झाले. 

मात्र, कार्यक्रम संपताच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांच्या समोर अग्रवाल एका दुचाकीवरुन पसार झाला. यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.