मिरज-पुणे मालगाडीचे 16 डबे घसरले, अनेक गाड्या रद्द

साताऱ्यातल्या आदर्की इथं रेल्वे मार्गावर मिरज-पुणे मालगाडीचे 16 डबे सकाळी रुळावरुन घसरले. सकाळी सातच्या सुमारास मालगाडीचे 16 डबे रुळावरुन घसरले.

Updated: Apr 22, 2015, 03:41 PM IST
मिरज-पुणे मालगाडीचे 16 डबे घसरले, अनेक गाड्या रद्द title=

सातारा: साताऱ्यातल्या आदर्की इथं रेल्वे मार्गावर मिरज-पुणे मालगाडीचे 16 डबे सकाळी रुळावरुन घसरले. सकाळी सातच्या सुमारास मालगाडीचे 16 डबे रुळावरुन घसरले.

सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे मार्गावर डबे अस्ताव्यस्त पसरले असून, डबे घसरण्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

डबे हटवण्याचं आणि रुळ दुरुस्तीचे काम दिवसभर सुरु राहणार असल्यामुळं रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. परिणामी सातारा-गोंदिया एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, निजामुदीन एक्सप्रेससह 3 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्यात. तसंच महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.