पुणे : पुरंदर तहसिल कार्यालयात एक आठवड्यापासून चालू असलेल्या या अनोख्या प्रेम कहानीने अवघ्या पाहणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
ही प्रेमकहाणी कोणत्या माणसाची किंवा मुलीची नाही, यामध्ये एक आठवडयापासून तहसिल कार्यालयामध्ये एका माकड़ाने कुत्राच्या पिलाला आपल्या जन्म दिलेल्या पिल्लाप्रमाणे जीव लावला आहे.
रोज सकाळी त्या पिल्लाला घेऊन ते माकड तहसिल कार्यालयाच्या छतावर जाऊन कुत्राच्या पिल्लासोबत खेळत असतं, हे दृश्य पाहुन कचेरीत येणाऱ्या जाणाऱ्यांना का प्रेमाचे कुतूहल वाटू लागले.