सावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड

घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!

Updated: Jun 10, 2015, 11:29 PM IST
सावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!

घरी आलेला गॅस सिलेंडर घेताना तपासून घ्या
सिलेंडरमधून गॅस आधीच काढलेला असू शकतो
कमी वजनाचा सिलेंडर देऊन तुमची होऊ शकते फसवणूक

नागपूर पोलिसांनी  सिलेंडरमधून एलपीजी गॅस चोरणाऱ्या तीन सिलेंडर डिलिव्हरी बॉईजचं कारस्थान उघड केलंय. लोखंडाच्या नळीच्या माध्यमातून हे तिघे सिलेंडरमधून गॅस चोरायचे आणि व्यावसायिक कामासाठी मिळणाऱ्या सिलेंडरमध्ये टाकायचे. प्रत्येक सिलेंडरमधून सुमारे ५ ते १० टक्के गॅस चोरी होत होता. ग्राहकांना वजनात फारसा फरक जाणवत नसे. तसंच गॅस सिलेंडरवर पुन्हा सिल करून ते ग्राहकांना देत असंत.  

या प्रकरणात या तीन गॅस डिलिव्हरी बॉईज व्यतिरिक्त संबंधित गॅस एजन्सीचे मालक किंवा अन्य कुणी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जातोय. 

एलपीजी गॅस सिलेंडर्सवर सबसिडी आहे. त्यामुळं सबसिडी असलेल्या सिलेंडरमधून गॅस चोरी करून त्यांनी फक्त ग्राहकांना नाही तर सरकारलाही फसवलंय. त्यामुळे यापुढे आपल्या घरी येणारा गॅस तपासून घेण्याचं आवाहन गॅस कंपनी आणि पोलीस करत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.