अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: नागपूरातील अतिशय व्यस्त असलेल्या इतवारी भागातील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 17 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी उघड झाली.
इतवारी परिसरात प्रशांत राऊत यांच्या मालकीचे राउत इमिटेशन, राउत आर्ट्स आणि राउत जनरल स्टोर नावाची दुकानं आहेत. दररोज तीनही दुकानातील व्यवसायातून एकत्रित होणारा गल्ला एका जागी जमा केला जातो. सोमवारी रात्री आरोपींनी दुकानाशेजारील गोडाऊनचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्या नंतर टेरेसवर जाऊन राऊत यांच्या दुकानाचं कुलूप तोडत दुकानात प्रवेश केला आणि रोकड लंपास केली.
चोरीच्या घटनेत दोन पेक्षा जास्त आरोपी सहभागी असू शकतात तसंच चोरीचा संशय हा दुकानातील आर्थिक व्यवहाराची माहिती असणाऱ्यांवर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.