नाशिक : सिंहस्थाच्या दुसऱ्या महापर्वणीला भाविकांची अलोट गर्दी झाली. नाशकात तीन आखाड्यांसोबत १७ लाख भाविकांचं स्नान केले. तर त्र्यंबक नगरीतही ५ लाख भाविकांची कुशावर्तावर डुबकी मारली.
दरम्यान, कुंभनगरीत अलोट गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक झालेली दिसून आली. त्र्यंबकश्वरमध्ये पोलीस आणि महंतांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच एक घोडा उधळ्याने साधू जखमी झाला. दिवसभर भाविकांचा ओघ कायम होता.
नाशिकच्या गल्लीबोळात शाही स्नानाचे शाही रंग दिसून येत होते. मिरवणुकीत कुठे तलवारबाजी तर कुठे टाळ मृदुंगाचा गजर दिसत होता. पोलिसांनी घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून साधू महंतांचा जल्लोष सुरुच होता.
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणा-या कुंभमेळ्यात आज दुसरं शाही स्नान पार पडलंय. सूर्य, चंद्र आणि गुरु हे सिंह राशीत आल्याने आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग आल्याने या पर्वणीला महापर्वणी असं म्हणतात.. या महापर्वणीच्या निमित्तानं कुंभनगरी भाविकांनी फुलून गेली.
त्र्यंबकेश्वरातील कुशावर्तावर पहाटेपासूनच शैव पंथियांच्या विविध आखाड्यांनी शाही स्नानासाठी हजेरी लावली.. श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या शाही स्नानानं शाही स्नानाला सुरुवात झाली.. त्यानंतर अनुक्रमे आवाहन आखाडा, श्री पंटायती अग्नी आखाडा, श्री पंचायती निरंजनी आखाडा, श्री पंचायती आनंद आखाडा, श्री पंचायती महानिर्वाण आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा श्री पंचायती नवा उदासीन आखाडा आणि श्री पंचायती निर्मल आखाड्यातील साधू-महंतांनी शाही स्नानाला हजेरी लावली. साधू-महंतांच्या स्नानानंतर कुशावर्त घाट भाविकांसाठी खुलं करण्यात आले..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.