पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांनी या पदासाठी दावेदारी केली असल्याने राष्ट्रवादीत पेच निर्माण झालाय.
विद्यमान महापौर शकुंतला ध-हाडे यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपला आहे. गेल्या सप्टेंबरपासून अडीच वर्षासाठी महापौरपद अनुसूचित जमाती साठी राखीव झालंय.
आता राष्ट्रवादी काँग्रेसने हे पद सव्वा सव्वा वर्षांसाठी दोघांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शकुंतला ध-हाडे यांना पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौर करण्यात आलं. त्यांचा कार्यकाळ आता संपला आहे.
राष्ट्रवादीकडे आता आशा सुपे आणि रामदास बोकड हे दोनच नगरसेवक अनुसूचित जमातीतील आहेत. त्यामुळं या दोघांपैकी एकाची महापौरपदी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दोघांनीही महापौर पदासाठी दावेदारी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.