सातारा : 'कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाही तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते... त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे' अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केलीय.
आपलं वय उलटून गेलंय, त्यात सरकारनं थोडी सवलत दिली तर सर्व परीक्षा देऊन, संतोषसारखं गणवेश घालून लष्करात जायचंय असं त्या म्हणतायत... संतोष महाडिकांच्या जीवनाचं तत्वज्ञानही त्या उलगडून दाखवतायत... आपल्या मुलीनंही लष्करामध्ये डॉक्टर व्हायचं ठरवलं आहे. तर मुलगाही सैन्यात गेला तर आपल्याला अभिमानच वाटेल, अशी भावनाही स्वाती यांनी बोलून दाखवली.
तर, संतोष याचं लहानपणापासूनच साहेब होण्याचं स्वप्न होतं. सर्वांवर खूप प्रेम करणारा आणि काळजी करणारा असा पुत्र पुन्हा होणे नाही अशा शब्दांत, शहीद कर्नल संतोष महाडिक यांची आई कालिंदी महाडिक यांनी भरल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या आठवणी जागवल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.