सांगली : पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीत पोलीस गुंग झाल्याची संधी ३ अट्टल गुन्हेगारांनी साधली असल्याची चर्चा आहे, आणि तीन अट्टल दरोडेखोर पळून गेले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त शनिवारी रात्री तासगावातील एका हॉटेलात पोलिसांनी जंगी पार्टीचे आयोजन केले होते.
तासगाव पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी पार्टीसाठी गेल्याची संधी साधून पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवलेले तीन अट्टल दरोडेखोर ब्रिटिशकालीन तुरुंगाच्या छतावरील कौले काढून पसार झाले.
रात्री उशिरा काही कर्मचारी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांची नशा आणि झोप उडाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.