पुणे : दिवाळीच्या खरेदीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. दिवे आणि आकाशकंदील यांच्या खरेदी साठी पुणेकर गर्दी करतायत. मात्र, यावेळी आकाशकंदिल ची खरेदी करताना देशी कंदील चीच मागणी केली जात आहे.
विक्रेत्यांनीही यंदा हँडमेड कंदिलांना प्राधान्य देत चायनीज मालाची विक्री थांबविल्याचं सांगितलं.
दरम्यान चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पाठराखण केल्याने, सोशल मीडियावर चीनी वस्तूंचा बहिष्कार टाकण्याचा सपाटा सुरू आहे, त्यांचा हा परिणाम असल्याचंही सांगण्यात येत आहे.