सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय.
केसरकरांनी आश्वासनांची पुर्तता केली नाही. त्यामुळे जिल्ह्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप करत नितेश आणि निलेश राणे यांनी आंदोलन पुकारलंय.
केसरकरांचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडीमध्ये काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालंय.
या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय तसंच जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.