राकेश त्रिवेदी, नागपूर : मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे.
कारागृह परिसरातच मुंबईचा गुन्हेगार याकूबला दफन करण्याची शक्यता आहे. तसेच कारागृहातच याकूबवर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता असून दफनविधीसाठी कारागृहात जमीन निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याकूब मेमनच्या फाशीच्या तारखेसंदर्भात सस्पेन्स निर्माण झालाय.
कारागृह प्रशासनाने याकूब मेमनच्या फाशीची तयारी सुरू केलीय. त्यातच आता अशी माहिती मिळतेय की याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याचं शव कारागृहातच दफन होऊ शकतं. फाशीनंतर प्रशासनाला सांप्रदायिक तणावाची शक्यता वाटत असल्याने जेल परिसरातच अंत्यसंस्कार होऊ शकतात. त्यामुळे फाशीनंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत याकूब मेमनवर कारागृह परिसरातच अंत्यसंस्कार होऊ शकतात.
याकूब मेमनच्या काही जवळच्या नातेवाईकांना दफनविधी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते, अशीही माहिती आहे. याकूबची पत्नी राहीन, मुलगी झुबैदासह अजून काही नातेवाईक यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कारागृह परिसरात दफनविधीसाठी जमीनही निश्चित करण्यात आलीय. मात्र शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासंबंधी याकूबचे वकील न्यायालयाकडे दाद मागू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.