पणजी : गोव्यात संघ आणि भाजपत झालेल्या तणावाचा फायदा शिवसेना घेऊ पाहत आहे. काल संध्याकाळी फिडाल्गो हॉलेटमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली.
तसंच, काही वेळा पूर्वी पणजीमधे राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या स्थानिक प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यात वेलिंगकर यांचे बंड आणि शिवसेनेला गोव्याच्या राजकारणात शिरकाव करण्याची संधी या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली.
शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवलीये. संघातून पदमुक्त केल्यानंतर वेलिंगकर यांनी गोवा प्रांताचा स्वतंत्र RSS स्थापन केला आहे.