मुंबई: जेएनयूच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रद्रोहाच्या केससाठी तयारी ठेवावी असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थी संघटनांना दिलाय. राष्ट्रीय प्रेम फक्त भाजपवालेच करतात असं वातावरण सध्या निर्माण केलं जात आहे.. सध्या अतिरेकी प्रवृतीच्या हातात देश आहे त्यांच्या विरोधात संघर्ष करायची तयारी आपल्याला ठेवावी लागेल असंही ते म्हणालेत.
तसंच केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या वेगवेगळ्या राज्यात होणा-या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होईल असं भाकीतही पवारांनी व्यक्त केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजीत पदाधिका-यांच्या मेळ्याव्यात ते बोलत होते..
तर तिकडे पुण्यामध्ये राज ठाकरेंनी मोदी सरकारला टोला हाणला आहे. कुणी भारत विरोधी घोषणा देत असतील तर त्यांना फोडून काढा मात्र भाजप या गोष्टीचं राजकारण करतंय असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही याचं सर्टीफीकेट भाजपनं द्याचची गरज नसल्याचंही ते म्हणाले.