शिवसेनेचा भाजपला टोला, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो'

शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाही. आज खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत भाजपला खडे बोल सुनावलेत, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो.' 

Updated: Jun 18, 2016, 11:50 PM IST
शिवसेनेचा भाजपला टोला, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो' title=

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाही. आज खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत भाजपला खडे बोल सुनावलेत, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो.' 

प्रत्येकबाबतीत सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना यांच्यात खटके उडत आहेत. भाजपवर जोरदार टीका करत शिवसेनेने त्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुंबई पालिका रस्ते घोटाळा प्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी करुन दाखवणारे जेलमध्ये जातील असा टोला लगावला होता. त्यावेळी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत उत्तर दिले. आम्हीच हा घोटाळा बाहेर काढलाय.

 

तर उद्धव ठाकरे यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमातही यावर स्पष्टीकरण दिलेय. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्त बदललेत. पालिकेत जे निर्णय घेण्यात येतात यात अधिकारी असतात. त्यामुळे घोटाळा आम्ही केलाय म्हणताय, याला अर्थ नाही. आयुक्त कोणी बदललेत. म्हणजेच थेट बोट मुख्यमंत्र्यांकडे जाते, असे मत मांडले.

दरम्यान, आज औरंगाबादमध्ये याच मुद्दावर उद्धव यांनी भाजपला जोरदार टोकलंय. आम्ही कोणत्याही थापा मारलेल्या नाहीत. आम्ही जे काही केलंय ते करुन दाखवलं आहे. तसेच महाबीजची दरवाढ कमी करून काय उपयोग, शेतकऱ्यांनी आधीच बियाणी खरेदी केलीत. सरकारचे धोरण चुकले, असा थेट हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय.