'शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी?'; पोलिसांनी नाकारली परवानगी

शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते का? या विषयावर ठाण्यात 'मुस्लिम युथ फोरम'चा परिसंवाद आयोजित करण्यात आलाय.

Updated: Feb 20, 2015, 11:02 PM IST
'शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी?'; पोलिसांनी नाकारली परवानगी title=
फाईल फोटो

ठाणे : शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते का? या विषयावर ठाण्यात 'मुस्लिम युथ फोरम'चा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. मात्र, हिंदूत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वाद निर्माण झाल्यामुळे ठाणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

'वर्षांनुवर्ष काही लोकांनी शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी असल्याचं चित्र रंगवलं होतं. त्यामुळे मुस्लिम समाजातल्यांनाही या राजाची थोरवी समजलीच नाही' असा आयोजकांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या परिसंवादाचं आयोजन केलं होतं.

त्याला हिंदूत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेत हा कार्यक्रम होऊ देऊ नका असा नारा दिला होता.. अखेर वाद टाळण्यासाठी पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. मात्र आता ठाण्यापुरता मर्यादीत असलेला हा कार्यक्रम आता राज्यभर घेणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.