पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू होती. त्यावर स्थानिकांनी जोरदार दगडफेक केली.
या दगडफेकीत अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख माधव जगताप जखमी झालेत. त्यांच्यावर रूबी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आलीय.
येरवडा परिसरातल्या गुंजन टॉकीजच्या शेजारी पोलीस ठाण्यातील आरक्षित असलेली जागा शैक्षणिक संस्थेला देण्याचा ठराव पालिकेत झाला होता. पण त्या ठिकाणी चायनीज हॉटेल सुरू करण्यात आलं होतं. याबाबत पालिकेत दोन वेळा सुनावणीही झाली होती. त्यानंतर आज सकाळी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आत्तापर्यंत तिघांना अटक करण्यात आलीय. अटक झालेल्यांनी नावं लालू शेख, मालू शेख, इरफान शेख अशी आहेत.