पनवेल : पनवेलच्या न्यू होरायझन शाळेविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौथ्या मजल्यावरून पडून सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं शाळेवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वर्गशिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्याध्यापिकेलाही अटक होण्याची शक्यता आहे. सहावीच्या वर्गातल्या खिडकीला अर्धवट ग्रील असल्यामुळंच गौरव कंक या विद्यार्थ्याचा खाली पडून मृत्यू झाल्याचं पुढं आलंय.
वर्गाच्या खिडकीला ग्रील नसल्यानं ही घटना घडली आहे. शाळेच्या चौथ्या मजल्यावर सहावीचे वर्ग भरविले जातात. या वर्गखोल्यांच्या खिडकींना ग्रिल नसून खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत.
अशाच एका खिडकीतून गौरव कंक खाली पडल्यानं तो जबर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी शाळेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, शाळेच्या मुख्यधापिकेने गौरव कंक हा खिडकीमधून पडला नसल्याचा दावा केला आहे. तो शाळेच्या गच्चीवरून खाली पडला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.