मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त, कामाचं भूमीपूजन तर राणेंची टीका

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आले. 

Updated: Jan 29, 2016, 11:29 PM IST
मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त, कामाचं भूमीपूजन तर राणेंची टीका title=

रत्नागिरी : मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आले. 

(बातमीच्या खाली व्हिडिओ पाहा)

२०१८ च्या अखेपर्यंत हे काम पूर्ण करण्याची योजना आहे.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केले. गडकरींच्या माध्यमातून राज्यातल्या रस्त्यांचे चित्र सुधारणार असल्याचा विशास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

तर एनडीए सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे रस्ते उभारणार असल्याचा निर्धार गडकरींनी व्यक्त केला. या भूमीपूजनाला केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, रत्नागिरीचे शिवसेनेच खासदार विनायक राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनीही खास उपस्थिती लावली होती. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नितीन गडकरींचे कौतुक करत निमंत्रण दिल्यामुळं त्यांचे आभार मानले. तर रिफायनरीच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी साधली, राणे यांनी यावेळी साधली.