प्रेम प्रकरणावरुन नागपुरात एकाची हत्या

गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भूपेश नगरात क्लिंट जुड हेल या तरूणाची हत्या करण्यात आलीय. ही हत्या प्रेम प्रकणावरुन झाल्याचा संशय आहे.

Updated: Jan 27, 2016, 06:16 PM IST
प्रेम प्रकरणावरुन नागपुरात एकाची हत्या title=

नागपूर : गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भूपेश नगरात क्लिंट जुड हेल या तरूणाची हत्या करण्यात आलीय. ही हत्या प्रेम प्रकणावरुन झाल्याचा संशय आहे.

नागपूरच्या अनंत नगरात राहणारा क्लिंट हा त्याच्या मैत्रिणीला सोडायला भूपेश नगरात जायचा. त्यावरून त्याचा स्थानिक तरूणांशी याआधी वादही झाला होता. प्रजासत्ताक दिनी रात्री १च्या सुमारास तो मैत्रिणीला सोडायला आला तेव्हा चौघांशी त्याचा पुन्हा वाद झाला.

तेव्हा पंकज ठाकूर, योगेश शर्मा, बलराम सिंग व राजेश तिवारी या चौघांनी चाकू व लाकडी दांड्यानं वार करून क्लिंटची हत्या केली. या मारहाणीत क्लिंटचा मित्र विजय जाधव गंभीर जखमी झालाय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका फरारी आरोपीचा कसून शोध सुरू आहे.