सांगली : जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांनीच हे पैसे भरल्याचे दाखवून पैसे हडप केले.
सांगली जिल्हातील विविध बँकांच्या १७ एटीएम मशीन मधील रक्कम हडप करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित लियाखत खान आणि अष्पाक बैरागदार याना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
चार दिवसांपूर्वी, नवीन नोटा चेंज करन्यासाठी दोन दिवस एटीएम बंद होते, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी तक्रार दाखल केल्या नंतर आरोपीना पोलिसांनी जेरबंद करण्यात आलं.