२२ दिवसांच्या चिमुकलीची दत्तक घेण्याच्या नावाखाली विकण्याचा डाव

बेटी बचाव देश बचाव ही मोहीम देशपातळीवर राबवली जात आहे. मात्र कागदी लक्ष्मीसाठी, घराची लक्ष्मी असलेल्या मुलींनाच आज विकलं जात आहे. अशीच घटना, नाशिकमधल्या मनमाडमध्ये घडलीय. 

Updated: Dec 2, 2015, 05:54 PM IST
२२ दिवसांच्या चिमुकलीची दत्तक घेण्याच्या नावाखाली विकण्याचा डाव title=

मनमाड : बेटी बचाव देश बचाव ही मोहीम देशपातळीवर राबवली जात आहे. मात्र कागदी लक्ष्मीसाठी, घराची लक्ष्मी असलेल्या मुलींनाच आज विकलं जात आहे. अशीच घटना, नाशिकमधल्या मनमाडमध्ये घडलीय. 

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता इथली सुनीता अमोल पवार ही विवाहिता. नवरा बेपत्ता असलेल्या सुनीताच्या पदरी अवघ्या २२ दिवसांची मुलगी आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या सुनीताच्या मुलीला दत्तक दिल्यास तिच्या मुलीला तरी चांगले दिवस दिसतील या विचारानं, पाच जणांच्या टोळक्यानं सुनीताच्या जुली या लहानगीला दत्तक घेण्याचा विचार सुनीतापुढे ठेवला. मात्र प्रत्यक्षात या चिमुरडीला विकण्याचा त्यांचा कट होता.

वेळीच सुनीता सावध झाली आणि तीन महिलांसह, दोन पुरुषांना पोलिसांनी अटक केली. लहान मुलं विकण्याचं रॅकेट यामध्ये सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र पैशांसाठी नाती विकायला काढणा-या या घटनेनं माणुसकीला पुन्हा एकदा काळीमा फासला गेलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.