उल्हासनगर : येथील पालिका निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष आरपीआयने (आठवले गटाने) धक्कादायक निर्णय घेतला. भाजपला दे धक्का देत शिवसेनेशी घरोबा केला.
दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्ष, आरपीआय (आठवले ) आणि टीम ओमी कलानी यांच्या युतीची जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र टीम ओमी कलानीने रिपब्लिकच्या बालेकिल्ल्यातील जागांवर आपला अधिकार सांगितला आणि भाजपने तो मान्य केल्याने शेवटी आरपीआयने भाजप सोबतची युती तोडली आणि शिवसेनेसोबत नवा घरोबा केला.
आज शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, मामा गायकवाड, यांनी शिवसेना आरपीआयच्या युतीची घोषणा केली. शिवसेनेने आरपीआयला 13 जागा सोडल्या आहेत.