बुलडाणा : राज्य सरकारनं देऊ केलेल्या कर्जमाफीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा होणार असल्याचा आरोप, बुलडाणातल्या सावकारग्रस्त शेतकरी समितीनं केला आहे.
राज्यातल्या २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी नोंदणीकृत सावकारांकडून कर्ज काढलंय. ते कर्ज माफ करण्यात येत असल्याची घोषणा, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केलीय. मात्र ही घोषणा फसवी असून, राज्यातल्या फक्त एक टक्का शेतकऱ्यांनीच अधिकृत सावकाराकडून शेतीसाठी कर्ज घेतल्याचं सावकारग्रस्त शेतकरी समितीनं सांगितलंय. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा मुळीच फायदा होणार नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवलीय.
शेतकऱ्यांनी फक्त सोनं तारण ठेवलं तरच राज्यातले नोंदणीकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देतात. तर दुसरीकडे अवैध सावकार शेतकऱ्यांची शेतजमीन खरेदी करून कर्ज देतात. म्हणून लागू केलेल्या सावकारी कायद्याची सराकरनं कडक अंमलबजावणी करण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केलंय. नाही तर दोन महिन्यांनी शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आणखी वाढलेले दिसेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.