वसई-विरार पालिका निवडणुकीत रंगत, वेगळी मोर्चेबांधणी

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका निवडणुकीचा फड आता रंगू लागलाय. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिवसेना-भाजप युती सज्ज झाली असताना काही नवी समीकरणंही यावेळी बघायला मिळू शकतात.

Updated: May 23, 2015, 07:49 PM IST
वसई-विरार पालिका निवडणुकीत रंगत, वेगळी मोर्चेबांधणी title=

वसई : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका निवडणुकीचा फड आता रंगू लागलाय. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिवसेना-भाजप युती सज्ज झाली असताना काही नवी समीकरणंही यावेळी बघायला मिळू शकतात.

वसई विरार  महापालिकेच्या ११५ साठी १४ जूनला  मतदान आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी विरुद्ध अन्य पक्ष असंच काहीसं या निवडणुकीचं स्वरूप आहे. ६महिन्या पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव बघता १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला आहे.. कदाचित त्यामुळेच आघाडीकडे इच्छुकांचीही भाऊगर्दी आहे. ११५ जागा साठी तब्बल १५०० अर्ज पक्षाकडे आलेत.

दुसरीकडे ठाकूर यांचे कट्टर विरोधक विवेक पंडित मात्र एकाकी पडल्याचं चित्र आहे. अद्याप शिवसेना-भाजप युती झाली नसली, तरी हे मित्रपक्ष एकत्र येतील, अशी शक्यता आहे... अद्याप याची चर्चाच सुरू असली, तरी शिवसेनेनं प्रचार सुरूही केलाय.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून २९ मेपर्यत असून यावेळी   ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यासाठी पालिकेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना फारच कमी वेळ मिळणार असल्यामुळे पुढले काही दिवस वसई-विरारमध्ये रणधुमाळी पाहायला मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.