विशाल करोळे, औरंगाबाद : व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजद्वारे अॅडमिनची अनेकदा टिंगळटवाळी केली जाते... एवढ्यापर्यंत ठीक आहे. मात्र तुमचा एखादा आक्षेपार्ह मेसेज ग्रुप अॅडमिनला अडचणीत आणू शकतो... तुमचा एखादा मेसेज ग्रुप अॅडमिनला चक्क तुरुंगात पाठवू शकतो... हो असं घडलंय औरंगाबादमध्ये... नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून...
होय, व्हॉट्सअॅप ग्रुपचं अॅडमिन होणं आता चांगलच महाग ठरू शकतं... थेट जेलची हवाही तुम्हाला खावी लागू शकते... औरंगाबादमध्ये नुकताच हा धक्कादायक प्रकार घडलाय... त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणा-यांची भंबेरी उडालीय.
एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुणीतरी धार्मिक भावना दुखावणारा फोटो शेअर केला. तसाच तो पुढंही शेयर करण्यात आला. मात्र काही नागरिकांना तो फोटो आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यांनी तातडीनं पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ तपास करत संबंधित ग्रुप अॅडमिनला अटक केली. आयटी अॅक्ट 66 ए आणि 265 नुसार पोलिसांनी ही कारवाई केलीय. व्हॉट्सअॅपचा कुणी गैरवापर करत असल्यास नागरिकांनीही पोलिसांना यासंदर्भात माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय.
तेव्हा व्हॉट्सअॅपचा गैरवापर करणा-यांनो आता सावधान....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.