मुंबई : मुंबई महापालिकेसह दहा महापालिका आणि 25 जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांवर कोणाचं वर्चस्व रहाणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची आणि त्यांच्या पक्षप्रमुखांची धाकधुक वाढली आहे.
तर दुसरीकडे मतदारांचीही उत्कंठा शिगेला पोहोचलीये. आज सकाळी दहा वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुमारे 70 टक्के मतदान झालंय, तर राज्यातील 10 महापालिकांसाठी सरासरी 56.30 टक्के इतकं मतदान झालंय.
मतदानाच्या टक्केवारीत नक्कीच वाढ झालीये, त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार हे पहाण्यासाठी मतमोजणीची प्रत्येक अपडेट तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी झी 24 तास सज्ज आहे.