www.24taas.com, मुंबई
आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.
आदर्शची जागा संरक्षण खात्याची की राज्य सरकारची याचा निर्णय आज होईल. जर संरक्षण खात्याची जमीन होती. तर ती कारगील युद्धातील शहीदांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती का ? याचंही उत्तर आज कळेल. दरम्यान, या प्रकरणी निलंबीत आयएएस अधिकारी जयराज फाटक आणि रामानंद तिवारी यांची सीबीआय कोठडी १७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आदर्श घोटाळ्याची आखणी बातम्या
फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी
जयराज फाटक, रामानंद तिवारी सीबीआयच्या ताब्यात
आदर्श घोटाळा : फाटक, प्रदीप व्यास निलंबित