झी २४ तास वेब टीम, मुंबई
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला म्हणून, त्यांना हेलिकॉप्टर बॉम्बनं उघडवण्याचा प्रियकराचा कट उघड झाला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र या तरुणानं ही शक्कल बॉडीगार्ड या सिनेमात पाहून लढवलीय. हे दहशतवादी कृत्य करु धजावणा-या सूरज शेट्टीला त्याच्या साथीदारासह गजाआड केलं आहे.
खेळण्यातल्या हेलिकॉप्टरवर बॉम्ब.. रिमोट कंट्रोलद्वारे तो खलनायकाचा उडवण्याचा कट.. हेलिकॉप्टरकडून होत असलेला अभिनेत्रीचा पाठलाग.. हा चित्तथरारक सीन तुम्ही बॉडीगार्ड सिनेमात नक्की पाहिला असाल.. पण अशाच हेलिकॉप्टर बॉम्बचा उपयोग वास्तवात कुणी केला तर.. काळ्या बुरख्याआड लपलेल्या या तरुणानं नेमकं हेच करण्याचा प्रयत्न केला..
सुरजचं गेल्या सहा वर्षापासून एका मुस्लिम मुलीवर प्रेम होतं... पण मुलीच्या कुटुंबियांना प्रेमाच हे नातं मंजूर नव्हतं...तिच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी नाकारल्यानं सूरजनं त्यांना संपवण्याचा कट रचला.. आणि त्यासाठी त्यानं बॉडीगार्ड सिनेमाप्रमाणे हेलिकॉप्टर बॉम्ब तयार केला...
हा हेलिकॉप्टर बॉम्ब तयार करण्यासाठी त्यानं संजय साळवी या साथीदाराची मदत घेतली. हा घातक कट पूर्णत्वास नेण्याआधी त्यानं बॉम्बची ट्रायल घेण्याचं ठरवलं.. आणि ट्रायलदरम्यान बॉम्ब त्याच्या साथीदाराच्या हातातच फुटला
जखमी संजयकडं केलेल्या चौकशीत पोलिसांना खरा प्रकार समजला आणि त्यांनाही धक्का बसला..त्यानंतर सूरजकडून बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.. आता हे साहित्य फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.