दहीहंडीच्या जल्लोषात चार वाजेपर्यंत मुंबईतले १६७ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींवर पालिकेच्या विविध हॉ़स्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. यातल्या ६८ गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय. तर इतरांना एडमिट करून घेण्यात आलंय. ठाण्यातले १२ गोविंदाही दहीहंडी फोडताना जखमी झाले आहेत. यात १० पुरूष आणि २ महिला गोविंदांचा समावेश आहे.
दहीहंडीच्या उत्साहाला ठाण्यात गालबोट लागलं... प्रशांत सातपुते नावाच्या एका बाइकस्वार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला, तर हंड्या फोडताना 26 गोविंदा जखमी झालेत. त्यामध्ये 14 महिला गोपिकांचाही समावेश आहे. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 14 गोपिंकासह 6 जखमी गोविंदांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर सहा जखमी गोविंदांवर कळवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.