मुंबई : २६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा कोर्टात सिद्ध करता यावा यासाठी आता मुंबई पोलिसांनी डेव्हिड हेडलीचा जबाब नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय.
दहशतवादी संघटानांशी संबंध असल्याप्रकरणी डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेत ३५ वर्षांची शिक्षा भोगतोय. त्याचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. याप्रकरणी प्रमुख आरोपी असणाऱ्या सय्यद जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जुंदलची आज कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
याच सुनावणीच्या वेळी हेडलीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता यावं याचे मुंबई पोलिसांचे प्रयत्न होते. त्यासाठी महिन्याभरापूर्वी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिल्लीत भेटलंही होतं. त्यानंतर अमेरिकन सरकारला हेडलीच्या जबाबाविषयी पत्र लिहून विनंतही करण्यात आलीय. पण अद्याप याविनंतीला प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, मुंबई पोलीस आणि अमेरिकन वकीलांमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.