मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यामुळं डान्स बार असोसिएनला मोठा दिलासा मिळालाय. मात्र सरकारनं पुन्हा बंदीचा निर्णय़ घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा डान्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजीतसिंग सेठी यांनी दिलाय.
अधिक वाचा : राज्यातील डान्सबार बंद राहावेत ही आमची भूमिका : CM
राज्यात डान्सबारवरील बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली आहे. डान्सबार बंदी संबंधी महाराष्ट्र पोलीस कायद्यात २०१४ मध्ये केलेल्या दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या दुरुस्तीच्या माध्यामातून राज्य सरकारनं डान्सबारवर बंदी घातली होती. त्याला राज्यातल्या बारमालकांच्या संघटनेनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली.
अधिक वाचा : डान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार
मात्र राज्यातल्या बारडान्सला मिळालेली परवानगी सशर्त असेल. बारमधल्या नाचामुळे अश्लिलता पसरणार नाही, महिलांची प्रतिष्ठा राखली जाईल हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची असेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी २००५ साली राज्यातल्या बारडान्सवर बंदी आणली होती. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, राज्य सरकार डान्सबार बंदीच्या भूमिकेवर ठाम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.