'काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, भाजपला पाठिंबा द्यावा'

काँग्रेस आज खिळखिळी झाली आहे, काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, भाजपला पाठिंबा द्यावा, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटलांनी म्हटलंय. काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून आलेलं हे पहिलं धक्कादायक वक्तव्य आहे.

Updated: Nov 6, 2014, 08:55 PM IST
'काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, भाजपला पाठिंबा द्यावा' title=

मुंबई : काँग्रेस आज खिळखिळी झाली आहे, काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा द्यावा, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटलांनी म्हटलंय. काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून आलेलं हे पहिलं धक्कादायक वक्तव्य आहे.

याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण काँग्रेस विधिमंडळपक्षाच्या नेतेपदाच्या स्पर्धेत नसल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसजनांच्या या भांडणीत पृथ्वीराज चव्हाण अजिंक्य ठरले आहेत. मिस्टर क्लीन अशी ओळख कायम ठेवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षांतर्गत जोरदार विरोध झाला, तरीही एका अर्थाने ते विजयी ठरले, पृथ्वीराज चव्हाणांचा कराडमधून पराभव होणार याकडे काही काँग्रेसजन डोळे लावून होते. पण पृथ्वीराज चव्हाण कराडमधून जिंकल्यावर त्यांचे डोळे उघडले.

या उलट ज्या राणेंनी कधीतरी पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वावर टीका केली होती, त्यांचा दारूण पराभव झाला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.