मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. भालचंद्र नेमाडे यांचं शिक्षण आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान
शिक्षण : खानदेशात मॅट्रिक(१९५५), (बी.ए.१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. १९६१, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- १९६४. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.
व्यवसाय : इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर(१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of oriental and African studies, London (१९७१-७१), आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.
कोसला: पहिली कादंबरी(१९६३)
कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
कोसलानंतर यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या.
हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबऱ्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.
१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.
पुस्तके
कादंबऱ्या
कोसला(१९६३)
जरीला(१९७७)
झूल (१९७९)
बिढार (१९६७)
हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)
हूल
कविता संग्रह
देखणी
मेलडी (१९७०)
समीक्षा
टीकास्वयंवर
तुकाराम
मुलाखती
साहित्याची भाषा
सोळा भाषणे
Indo-Anglian Writing
The Influence of English on Marathi : A Sociolinguistic and Stylistic Study
नेमाडे यांच्या विषयी आणि त्यांच्या साहित्याविषयीचे लेख
एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा
खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
नेमाड्यांचा लेखकराव होतो तेव्हा
मेलडी - भालचंद्र नेमाडे
रसग्रहण स्पर्धाः ‘हिंदू’-भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे: साहित्याचे समृद्ध जाळे...
‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार
भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत
किशोर सानप : भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी
किशोर सानप : भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.