'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ'

मुंबईकरांवरचा हा बोझा कमी करायचा असेल तर महापालिकेलाच पुढाकार घ्यावं लागेल, असं बेस्ट समितीनं म्हटलंय.

Updated: Nov 20, 2014, 08:34 PM IST
'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ' title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीनं दोन रूपयांच्या प्रवासी दरवाढीला मंजुरी दिल्यानं मुंबईकरांचा प्रवास महागणार, हे आता स्पष्ट झालंय. पण, मुंबईकरांवरचा हा बोझा कमी करायचा असेल तर महापालिकेलाच पुढाकार घ्यावं लागेल, असं बेस्ट समितीनं म्हटलंय.

मुंबई महापालिकेनं पुढील वर्षीही दीडशे कोटी रूपयांची मदत दिल्यास एक एप्रिलपासून होणारी भाडेवाढ रद्द केली जाईल, असं समितीनं स्पष्ट केलंय. महत्त्वाचं म्हणजे, शिवसेना, मनसे, भाजप या तिन्ही पक्षांनी या भाडेवाढीला संमती दिलीय. 

ही दरवाढ दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. १ फेब्रूवारीपासून एक रूपये आणि एक एप्रिलपासून एक रूपये अशा दोन टप्प्यांत ही भाडेवाढ करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचे पासही महागणार आहेत. शिवाय ज्येष्ठ आणि अंध व्यक्तींच्या पास दरातही वाढ होणार आहे. 

२०१५-१६ च्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीनं मंजुरी दिली. गेल्या चौदा वर्षात एसटीनं सातवेळा भाडेवाढ केलेली असताना बेस्टनं केवळ दोनदाच भाडेवाढ केली आहे. त्यामुळं बेस्ट वाचविण्यासाठी भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. बेस्ट सध्या चार हजार कोटी रूपये तोट्यात आहे. तसंच वाढता खर्च लक्षात घेऊन ही भाडेवाढ करण्याचा निर्णय झालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.