मुंबई : दिघ्यातील चार इमारतींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उद्या इमारती रिकाम्या करुन कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
दिघा येथील अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता, प्लाझा आणि दत्तकृपा इमारतीची याचिका फेटाळली. त्यामुळे आता या इमारती लवकरच पाडण्यात येणार आहेत. या इमारती लवकरच रिकाम्या करु असं या इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयाला सागंतिले होते. शेवटी सर्वोच्च न्यायालयातून ही दिलासा न मिळाल्याने आज मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती कोर्ट रिसिव्हरना ताब्यात देण्याचे आदेश दिलेत.