भाजप-सेना सरकारचा अधिकाऱ्यांना दणका, प्रशासनात विभागात मोठे फेरबदल

राज्य सरकारने सत्तरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही आयएएस अधिकाऱ्यांचे मंत्र्यांशी पटत नव्हते त्यांची उचलबांगडी केली. तर काहींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या  बदल्या करण्यात आल्यात.

Updated: Apr 28, 2016, 10:50 AM IST
भाजप-सेना सरकारचा अधिकाऱ्यांना दणका, प्रशासनात विभागात मोठे फेरबदल title=

मुंबई : राज्य सरकारने सत्तरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही आयएएस अधिकाऱ्यांचे मंत्र्यांशी पटत नव्हते त्यांची उचलबांगडी केली. तर काहींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या  बदल्या करण्यात आल्यात.

सर्वांत मोठा प्रशासकीय खांदेपालट सरकारने केलाय. ७३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून अश्विनी जोशी यांची तर सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची नवी मुंबईला बदली.

आपल्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत आलेल्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची, अखेर अपेक्षेप्रमाणे बदली झाली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून त्या आता मुंबईत येत आहेत. त्यांच्या जागी कल्याणकर हे ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्रं सांभाळतील. 

दुसरे कार्यक्षम सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचीही सोलापूर जिल्हाधिकारी पदावरुन बदली झाली आहे. वाळू माफियांविरोधातल्या धडक कारवाया आणि पारदर्शी कार्यक्षम प्रशासन यामुळे, तुकाराम मुंडे यांनी सोलापूरमध्ये आपल्या कामाची छाप सोडली होती. मुंडे यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. त्यांच्या जागी रणजित कुमार सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. 

सत्तरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा देण्यात आली आहे. 

या आहेत प्रमुख बदल्या

- नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह हे मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी.
- ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची मुंबई शहरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
- गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
- उपमन्यु चटर्जी - सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबई. 
- ऊज्ज्वल ऊके - प्रधान सचिव वस्रोद्योग, सहकार, पणन. 
- प्रवीण दराडे - अतिरिक्त महानगर आयुक्त एमएमआरडीए. 
- एस.व्ही.आर. श्रीनिवास - व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम 
- आशिषकुमार सिंह - प्रधान सचिव; सार्वजनिक बांधकाम. 
- मुकेश खुल्लर - प्रधान सचिव (सेवा)
- सामान्य प्रशासन विभागात डॉ.भगवान सहाय- अतिरिक्त मुख्य सचिव कृषी, पशु संवर्धन व दुग्धविकास विभाग. 
- सीताराम कुंटे - प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग. 
- विजयकुमार - प्रधान सचिव कृषी व पशू संवर्धन विभाग. 
- सुधीरकुमार श्रीवास्तव - अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन व बंदरे गृह विभाग. 
- मिता राजीव लोचन - प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त विभाग. 
- वंदना कृष्णा - प्रधान सचिव (लेखा व कोषागरे) वित्त विभाग.
- व्ही.गिरीराज - प्रधान सचिव (व्यय) वित्त विभाग. 
- दीपक कपूर - प्रधान सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग 
- महेश पाठक - प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग. 
- प्रभाकर देशमुख - सचिव ग्रामविकास व पंचायत राज, जलसंधारण. 
- डी.के.जैन - अतिरिक्त मुख्य सचिव वित्त. 
- एकनाथ डवले - सचिव रोजगार हमी योजना व जलसंधारण. 
- के.एच.गोविंदराज - विभागीय आयुक्त नाशिक 
- मालिनी शंकर - अतिरिक्त मुख्य सचिव मदत व पुनर्वसन, महसूल व वनविभाग 
- सतीश गवई - प्रधान सचिव पर्यावरण विभाग. 
- आय.एस.चहल - प्रधान सचिव जलसंपदा विभाग.  
- एस.के.बागडे - सचिव सामाजिक न्याय विभाग. 
- तुकाराम मुंढे - महापालिका आयुक्त; नवी मुंबई. 
- संपदा मेहता - जिल्हाधिकारी अहमदनगर. 
- सुमित मलिक - पाणीपुरवठा व स्वच्छता.