शिववडा, पोहेनंतर भाजपचा नमो चहा

आधी शिवसेनेचा शिववडा त्यानंतर काँग्रेसचे पोहे. आता मुंबईकरांना भाजपच्या गरमागरम चहाची चव चाखता येणार आहे. मुंबईकरांच्या हाती आता पंतप्रधान मोदींच्या नावानं सुरु होणार चहाचा कप असेल. कारण मुंबईत लवकरच नमो टी स्टॉल सुरु होण्याची शक्यता आहे. 

Updated: May 28, 2016, 08:59 AM IST
शिववडा, पोहेनंतर भाजपचा नमो चहा title=

मुंबई : आधी शिवसेनेचा शिववडा त्यानंतर काँग्रेसचे पोहे. आता मुंबईकरांना भाजपच्या गरमागरम चहाची चव चाखता येणार आहे. मुंबईकरांच्या हाती आता पंतप्रधान मोदींच्या नावानं सुरु होणार चहाचा कप असेल. कारण मुंबईत लवकरच नमो टी स्टॉल सुरु होण्याची शक्यता आहे. 

या सोबतच नमो फू़ड्स स्टॉल्सही उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मांडण्यात आलीय. मुंबई महापालिकेचे सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी ही संकल्पना मांडलीय. सध्या हा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासाठी गेलाय.

नमो चहा शिवसेनेसाठी डोकेदुखीही ठरु शकतो. याआधीचा शिवसेनेचा वडापाव अद्यापही पूर्णपणे अधिकृत झालेला नाही. दुसरीकडे अधिकृत नमो टी स्टॉल हा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळं येत्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर चहा-वड्याचं युद्ध रंगणार आहे.. 

शिवसेना आणि भाजपच्या या चहा-वड्याच्या युद्धामुळं मुंबईच्या फूटपाथची पुरती वाट लागणार असल्याचं बोललं जातंय.