चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला

मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे. 

PTI | Updated: May 6, 2015, 07:39 PM IST
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला title=

मुंबई: मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे. 
 
मुंबई शेअर बाजार 27 हजारांची खाली आला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा उसळी घेतलीय. त्यामुळं त्याचा शेअर  बाजारावर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.  

जीएसटी विधेयकालावरून गोंधळ झाला. विधेयक लोकसभेत पास झालं असलं तरी सेवा आणि विनिर्माण क्षेत्रामध्ये सुस्ती आणि चिंतेमुळं बाजारावर दबाव दिसला. 

काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला शिक्षा झाल्यानं सुद्धा शेअर बाजारात घसरण झाली, असं होऊ शकतं. मोठ्या संख्येनं एचएनआय गुंतवणूकदार आणि व्यापारी आपला पैसा शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि चित्रपट उद्योगा दरम्यान स्थानांतरीत करतात.

मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा सेंसेक्स 27,473.36 अंकावर उघडल्यानंतर 
27,501.15 पर्यंत गेला. नंतर मात्र 27,000 अंकांनी खाली आला. आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, सिप्ला आणि आयटीसी सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.