www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज चार आरोपींविरूद्ध किला कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. तर यातील पाचवा आरोपी अल्पवयीन असल्यामुळं त्याच्याविरूद्ध ज्युवेनाईल कोर्डात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
हे आरोपपत्र ६०० पानी असून जवळपास ८० जणांच्या साक्षी यात घेतल्या जाणार आहे. मोहम्मद कासीम बंगाली, सलीम अन्सारी, विजय जाधव आणि सिराज रहेमान अशी या चार आरोपींची नावं आहेत. तर पाचवा आरोपी अल्पवयीन आहे. मुंबईत २२ ऑगस्ट रोजी पाच नराधमांनी शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये असाईनमेंटसाठी गेलेल्या एका महिला फोटोग्राफरवर गँगरेप केला होता.
या पाच आरोपींनी यापूर्वीही शक्ती मिल परिसरातच सामूहिक बलात्काराचे दोन गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. राज्य सरकारनं मुंबई गँगरेपचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची परवानगी दिलीय. प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम या खटल्यात सरकारच्यावतीनं काम पाहणार आहेत. दिल्ली गँगरेपप्रमाणंच या प्रकरणातील आरोपींवरील गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कठोर शिक्षा होईल, अशी मुंबई पोलिसांना आशा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ