भुजबळांनी तेलमाफियांविरोधी कारवाई थांबविण्यासाठी दबाव टाकला- कोकीळ

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकला होता असा थेट आरोप माजी पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात तत्कालिन पोलीस आयुक्त अरूण पटनायक आणि संजीव दयाळ या दोघांकडेही लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही कोकीळ यांनी केला आहे.

Updated: Jun 17, 2015, 04:09 PM IST
भुजबळांनी तेलमाफियांविरोधी कारवाई थांबविण्यासाठी दबाव टाकला- कोकीळ title=

मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकला होता असा थेट आरोप माजी पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात तत्कालिन पोलीस आयुक्त अरूण पटनायक आणि संजीव दयाळ या दोघांकडेही लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही कोकीळ यांनी केला आहे.

कोकीळ यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यात सांगितलं, आपल्या वैयक्तिक सचिवाच्या माध्यमातून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सतत दबाव टाकत होते. तेलमाफियांच्या विरोधात कारवाई करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मी प्रत्येकवेळी त्यांच्या दबावाला बळी न पडता कारवाईचा धडाका चालू ठेवला आणि बदली झाल्यानंतरही काम चोख केलं, असं कोकीळ यांनी सांगितलं. 

समीर भुजबळ यांनीही एमआयटी इथल्या कार्यालयात बोलावून आपल्याला तेलमाफियांवर कारवाई करू नका असं सांगितल्याचं कोकीळ यांनी म्हटलं आहे. आमच्यासाठी पोलीस आयुक्त हेच सर्वोच्च अधिकारी असतात, त्यामुळं अशा दबावाची कल्पना मी त्या त्या वेळी आयुक्तांना दिली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही असंही कोकीळ म्हणाले. 

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन बांधकामप्रकरणात घोटाळ्याचा आरोप असलेल्या छगन भुजबळांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खातं आणि सक्तवसुली संचालनालयानं कारवाईचा बडगा उगारला असल्यानं कोकीळ यांच्या आरोपांनी भुजबळांची आणखी अडचण होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.