मुंबई : छगन भुजबळ यांच्यावर 'अॅन्टी करप्शन ब्युरो'नं (एसीबी) केलेली कारवाई ही कोणत्याही आकसबुद्धीनं केलेली नाही, असं स्पष्टीकरण देतानाच 'आगे आगे देखो होता है क्या?' अस सूचक वक्तव्यही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला गेलाय. आज राज्यभरात ठिकाणी एकाच दिवशी एसीबीनं टाकलेल्या छाप्यांमुळे भुजबळ कुटुंबीयांचं धाबं चांगलंच दणाणलंय.
यावर बोलताना, भुजबळ यांच्यावर होत असलेली कारवाई कोर्टाच्या आदेशानुसारच होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. भुजबळ यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारीनंतर एसीबीनं भुजबळांवर एफआयर दाखल केलं. त्यानंत छापे टाकण्यासाठी आवश्यक ती अनुमतीही एसीबीनं मिळवलेली आहे... आणि त्यानुसारच हे छापे टाकले गेले असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
आमचा कोणावरही आकस नाही... तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करायचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. त्याचनुसार ही कारवाई होतेय. एसीबीच्या चौकशीत सापडलेल्या पुराव्यानंतर भुजबळांवर कारवाई सुरू आहे... यापुढेही ज्यांच्या ज्यांच्याविरुद्ध पुरावे आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.