सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस

उन्हाळ्याच्या काहिलीनं हैराण झालेल्या देशवासियांवर पावसाची मोठी मेहरबानी झालीय. यंदा मान्सूनचं कधी नव्हे ते वेळेवर आगमन झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे वरूणराजानं गेल्या तीन दिवसांत एवढी कृपादृष्टी केलीय की, सरासरीपेक्षा तब्बल ११ टक्के इतका जास्त पाऊस कोसळलाय.

Updated: Jun 16, 2015, 03:43 PM IST
सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस title=

मुंबई : उन्हाळ्याच्या काहिलीनं हैराण झालेल्या देशवासियांवर पावसाची मोठी मेहरबानी झालीय. यंदा मान्सूनचं कधी नव्हे ते वेळेवर आगमन झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे वरूणराजानं गेल्या तीन दिवसांत एवढी कृपादृष्टी केलीय की, सरासरीपेक्षा तब्बल ११ टक्के इतका जास्त पाऊस कोसळलाय.

या वाढलेल्या पावसामुळं शेतीच्या कामांना वेग येणार आहे. यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस म्हणजे जेमतेम ८८ टक्केच पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. मात्र पहिल्या तीन दिवसांतच सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस झालाय. 

गेल्या २४ तासात सरासरीपेक्षा ७६ टक्के जास्त पाऊस पडलाय. शनिवारी सरासरीपेक्षा ४६ टक्के जास्त, तर गेल्या शुक्रवारी सरासरीपेक्षा २२ टक्के जास्त पाऊस पडला होता. महत्त्वाची बाब म्हणजे १ जून ते १० जून या कालावधीत सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी पाऊस पडला होता. 

मात्र गेल्या तीन दिवसांत पावसानं सर्व बॅकलॉग भरून काढलाय. मान्सून आता महाराष्ट्रात सर्वदूर पसरला असून, सूरत, राजपूत आणि दार्जिलिंगमध्येही मान्सूनचा जोर दिसतोय. कोकणात सध्या मान्सून चांगलाच सक्रीय झालाय. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस होतोय. गेल्या चोविस तासात खेड, गुहागर, चिपळूण, दापोलीत दमदार पाऊस झालाय. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातही दमदार पाऊस झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.