राकेश त्रिवेदी, मुंबई : आजवर आपण अमली पदार्थांची अनेक नांव ऐकली आहेत... एलएसडी, एक्सटीसी, मेफेड्रीन, एम डी, म्याऊ म्याऊ... या अंमली पदार्थांबरोबरच आता आणखी एक नवं नाव या यादीत आलंय... एन-बॉम्ब... आणि ते मुंबईतही पोहोचलयं... तरूणाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नवीन अंमली पदार्थांविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट...
ब्राजील, ऑस्ट्रेलिया, युरोप यांसारख्या देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'एन बॉम्ब' हे ड्रग्सच्या नशेल्या दुनियेतल नवीन आणि सर्वाधिक खतरनाक नाव भारताच्या सीमेत दाखल झालंय. नारकोटिक्स ब्युरोनं नुकतीच गोवा आणि बंगळूरूमध्ये धडक कारवाई करत काही ड्रग्स माफियांना अटक केली. त्यांच्याकडून एन-बॉम्ब हे खतरनाक ड्रग्स जप्त करण्यात आलंय, अशी माहिती नारकोटिक्स ब्युरोचे विभागीय संचालक कुमार संजय झा यांनी दिलीय.
या ड्रग्समुळे आपण सुपर हिरो असल्याचा भास त्या व्यक्तीला होऊ लागतो... आपण आकाशात उंच भरारी घेऊ शकतो किंवा समुद्रात कितीही किलोमीटर अंतर पोहून पार करू शकतो, असं या नशेत व्यक्तिला वाटू लागतं.
ऑस्ट्रेलियात एका २२ वर्षीय युवकानेही नशेच्या भरात एका उंच इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचा मृत्यू झाला.
सुपरहिरोचा आभास निर्माण करणाऱ्या या ड्रग्सला पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक-स्पाईडरमॅन, आय़-25 (I-25) अशा अनेक नावानं ओळखलं जातं... भारतात हे ड्रग्स २५० ते ३०० रूपयांत उपलब्ध होतं. ही किमंत इतर ड्रग्सच्या तुलनेत तशी कमी आहे.
हे ड्रग्स पावडर, टॅबलेट आणि लिक्विड आशा तीन्ही रूपांत उपलब्ध आहे. मात्र, या ड्रग्सच ब्लॉटर-पेपर हे रूप सर्वत्र परिचित आहे. याचा एक तुकडा जिभेवर ठेवताच नशा यायला लागते... हे स्वस्तात उपलब्ध असल्यानं एलएसडीला पर्याय म्हणून पार्टीजमध्ये याचा वापर वाढताना दिसतोय... हे ड्रग्स जप्त जरी केलं असलं तरी हे नाव नवं असल्यानं, NDPS अॅक्ट नुसार प्रतिबंधीत ड्रग्सच्या यादीतही याचा समावेश नाही. त्यामुळे कोणतीच कारवाई करता येत नसल्याच नारकोटीक्स ब्युरोचं म्हणणं आहे.
या ड्रग्सनं अवघ्या काही दिवसांतच या नशिल्या दुनियेत धुमाकुळ घातलाय... आणि तरूणाईत याची मागणी झपाट्यानं वाढत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे... या अश्या नव-नव्या ड्रग्सच्या येण्यानं तरूण पिढीच आयुष्य उद्ध्वस्त होतंय... येत्या २६ जूनला साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी अश्या नव-नव्या ड्रग्सची माहिती देऊन जन जागृती करण्याचा नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचा प्रयत्न आहे. मात्र, या प्रयत्नांसोबतच आपणही आपल्या मुलांच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून जागरूक रहायला हवं... तरच हे विष पसरण्याआधी रोखल जाऊ शकेलं.